बंगळुरू : तिसऱ्या टी20मध्ये भारतानं इंग्लंडला 75 रननी हरवून सीरिजही खिशात टाकली. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो लेग स्पिनर युझुवेंद्र चहाल. चहालनं चार ओव्हरमध्ये 25 रन देऊन तब्बल सहा विकेट घेतल्या. आंतरराष्ट्रीय टी20मध्ये एका मॅचमध्ये एवढ्या विकेट घेणारा चहाल हा पहिला भारतीय ठरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचनंतर युवराज सिंगनं चहालची मुलाखत घेतली. तुझं वजन जास्त आहे का बॉलचं? मी तुला उचलून घेतल्यावर तुला कसं वाटलं? असे उलटसुलट प्रश्न युवीनं चहालला विचारले. या प्रश्नांना चहालनंही तशीचं उत्तरं दिली आहेत.


पाहा युवराजला काय म्हणाला चहाल