मुंबई: टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी युवराज सिंगच्या पायाला दुखापत झाली. या दुखापतीमुळे युवराज वेस्ट इंडिजविरुद्धच्या सेमी फायनलला मुकला. तसंच यंदाच्या मोसमात हैदराबादच्या संघाकडून खेळायची संधी युवराजला मिळाली आहे, पण दुखापतीमुळे अजूनही युवराज बाहेरच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराज लवकरच फिट होईल अशी अपेक्षा हैदराबादच्या संघाला आहे. यासाठी युवराजही जोरदार प्रयत्न करत आहे. पायाला प्लॅस्टर असूनही युवराज जिममध्ये वजनं उचलून व्यायाम करत आहे.