बंगळुरू : तिसऱ्या टी 20मध्ये भारतानं इंग्लंडचा 75 रननी धुवा उडवला आणि मालिकाही खिशात टाकली. लेग स्पिनर युझुवेंद्र चहालनं या मॅचमध्ये 6 विकेट घेऊन इंग्लडच्या बॅट्समनना धूळ चारली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण क्रिकेटआधी चहालनं बुद्धीबळामध्येही यश मिळवलं आहे. चहालनं अंडर 12 च्या बुद्धीबळ स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ग्रीसमधली वर्ल्ड यूथ चेस चॅम्पियनशीप, कोझिकोडमध्ये झालेली एशियन यूथ चेस चॅम्पियनशीपमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. 2003मध्ये चहाल 11 वर्षांचा असताना तो भारताकडून बुद्धीबळ खेळला होता.


टी 20 क्रिकेटमध्ये रणनिती आखताना डोक्याचा जास्त विचार करावा लागतो, त्यामुळे बुद्धीबळाचा मला क्रिकेटमध्येही उपयोग होतो, असं चहाल म्हणाला आहे. हरियाणाच्या जिंदमधलं चहाल यांचं कुटुंब मध्यमवर्गीय आहे. बुद्धीबळाच्या खेळासाठी लागणारा पैसा आणि कोच मिळत नसल्यानं युझुवेंद्रनं बुद्धीबळ सोडल्याची प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी दिली आहे.