मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि सागरिका घाटके यांच्याबद्दलच्या चर्चांना आज अखेर विराम मिळालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झहीर खान आणि सागरिका आता नव्या नात्यात अडकत आहेत. याबाबतचा फोटो खुद्द झहीर खानने शेअर केलाय. 


हा फोटो शेअर करताना झहीर म्हणालाय, बायकोच्या चॉईसवर कधीही हसू नका. तुम्हीही तिचीच चॉईस असता. पार्टनरर्स फॉर लाईफ असं त्यानं म्हटलंय. 


युवराज आणि हेझल यांच्या लग्नात जहीर आणि सागरिका यांनी एकत्रित उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर झहीर आणि सागरिका यांचे अफेअर असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतही अनेकदा या दोघांना एकत्रित पाहिले गेले.