मुंबई : तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर तुम्हाला कधी-कधी प्रश्न पडत असेल की तुमच्या लॅपटॉपच्या चार्जरला असलेली ही गोल काळी गोष्ट काय आहे ? तुम्हाला ती गोष्ट लहान वाटत असेल पण त्याचं काम खूप महत्त्वाचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॉनिटर, प्रिंटर, व्हिडिओ कॅमेरा, एचडीएमआय केबल आणि इतर उपकरणांच्या चार्जर किंवा इलेक्ट्रॉनिक केबलला ही वस्तू लागलेली दिसते.


सिलेंडरसारखी दिसणारी ही वस्तू फेराइट बीड किंवा फेराइट चोक या नावाने ओळखली जाते. शिवाय ब्लॉक्स, कोर्स, रिंग्स, ईएमआय फिल्टर्स या नावाने देखील त्याला ओळखलं जातं. हे एक इंडक्टर आहे जे इलेक्ट्रॉनिक सर्किट्स मध्ये येणाऱ्या हाय फ्रिक्वेंसी न्वाइजला कमी करतो.


फेराइट सिलेंडर हा तुमच्या लॅपटॉपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक न्वाइज पासून वाचवतो. हे एका एसी-डीसी कनवर्टर सारखं काम करतो. 
जर हे उपकरण नसेल तर स्क्रिन हलतांना दिसेल. मोठ्या प्रमाणात जर इलेक्ट्रिकल एनर्जी वायरमधून जात असेल तर फक्त चार्जिंगसाठी आवश्यक असणारं करंटच हे उपकरण लॅपटॉपला पास करतं.