नवी दिल्ली : रिलायन्स जिओ भारतात लॉन्च झाल्यानंतर इतर टेलिकॉम  कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. रिलायन्स जिओने बाजारात आल्यानंतर नवनवीन कल्पना लढवून भारतातील अनेक ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा रेकॉर्ड बनवला आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओने बाजारात प्रवेश केल्यानंतर 83 दिवसात पाच कोटी ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा आकडा पार केला आहे. तसेच कंपनीचे प्रत्येक मिनिटाला 1000 ग्राहक आणि पूर्ण दिवसाला तब्बल सहा लाख ग्राहक जोडले जात आहेत.

रिलायन्स जिओ जगातील झपाट्याने प्रगती करणारी कंपनी ठरली आहे. सध्याच्या काळात भारती एअरटेलचे 26.29 करोड पेक्षा अधिक ग्राहक आहेत. तसेच वोडाफोनचे 29 कोटी आणि आयडियाचे 18 कोटी पेक्षा अधिक ग्राहक आहेत. एअरटेल, आयडिया, वोडाफोन सारख्या कंपन्यांना या यशापर्यंत पोहचण्यासाठी बारा ते तेरा वर्ष लागली.

पाच सप्टेंबरला रिलायन्स कंपनीच्या रिलायन्स जिओने सेवेची सुरूवात केली होती. कंपनीकडे पूर्ण देशात 4 जी इंटरनेट सेवा देण्याचा अधिकृत परवाना आहे. सप्टेंबर महिन्यात जिओ ग्राहकांची संख्या 1.6 कोटी होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात जिओने पाच कोटीपेक्षा ही अधिकचा आकडा पार केला आहे. त्यामुळे रिलायन्स जिओ सध्या व्यावसायिक विश्वात सर्वोच्च स्थानावर आहे.
 
30 डिसेंबर 2016 ला जिओ कलेक्शन घेतल्यास जिओच्या सर्व सेवा 31 डिसेंबर 2016 पर्यंत फ्री मिळणार आहेत. जानेवारी 2017 पर्यंत कंपनी बिलींग सुरू करणार आहे. त्यामध्ये कधी कधी डेटा वापर करणाऱ्यासाठी प्रतिदिन 19 रूपये आणि कमी डेटा वापरणाऱ्यासाठी महिना किमान 149 रूपयांपर्यंत बिल येणार आहे. जिओने सांगितले की, आमची वॉईस आणि रोमिंग सेवा नेहमी फ्री असणार आहे.