ठाणे : एकाच कुटुंबातील १४ जणांची हत्या ही नरबळी प्रथेमुळे असण्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. पोलीस त्या दिशेने तपास करत असल्याचे पुढे आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी सकाळी उघडकीस आलेल्या ठाणे हत्याकांडामागील उद्देश पोलीस शोधून काढण्याच्या प्रयत्नात आहेत. हस्नैन अन्वर वारेकर या तरुणाने त्याच्याच कुटुंबातील १४ जणांची गळा चिरुन हत्या केली होती आणि त्यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या केली.


या हत्याकांडीत एकमेव जीवंत व्यक्ती साबिया शोएब भरमाल हिचा जवाब नोंदवून घेण्याची पोलीस वाट पाहात आहेत. काहींच्या मते संपत्तीच्या वादातून हे हत्याकांड झाले होते. पण, त्यासंबंधीचे काही धागेदोरे अद्याप तरी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.


हिंदुस्थान टाइम्समधील एका वृत्तानुसार पोलीस अनेक शक्यता वर्तवत आहेत. त्यातील एका शक्यतेनुसार हे हत्याकांड नरबळी देण्याच्या उद्देशाने घडले का, ही शक्यताही पोलीस तपासत आहेत.


'पोलीस तपासात असं आढळून येतंय की, या हत्याकांडातील बळी एक तर झोपले होते किंवा बेशुद्ध होते. कोणाचीही जबरदस्तीने हत्या करण्यात आल्याचे पुरावे अद्याप तरी हाती लागलेले नाहीत. ज्या पद्धतीने गळा कापण्यात आला आहे, ते पाहता एखाद्या जाणकार व्यक्तीने हे कृत्य केल्याचं जाणवतं. मिळालेल्या माहितीनुसार हस्नैन याला खाटीकची सवय होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे.


हस्नैन हा धार्मिक प्रवृत्तीचा होता आणि दिवसातून पाच वेळा नमाज अदा करत असे. पण, तो कोणत्याही धार्मिक अतिरेकात मात्र सहभागी नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. बकरी ईदच्या दिवशी बकऱ्याचा बळी देणाऱ्या धारदार सुऱ्यानेच त्याने या १४ जणांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.