डोंबिवलीत जत्रेची धूम
डोंबिवलीत सध्या धूम आहे ती मनसेनं आयोजित केलेल्या जत्रेची. कला, खाद्य, संस्कृती आणि मनोरंजनाचा अनोखा मिलाप या जत्रेतून समोर आलाय. खरे वाटतील असे वन्य प्राणी, हजारो दुर्मिळ चित्रांचे कलादालन.
डोंबिवली : डोंबिवलीत सध्या धूम आहे ती मनसेनं आयोजित केलेल्या जत्रेची. कला, खाद्य, संस्कृती आणि मनोरंजनाचा अनोखा मिलाप या जत्रेतून समोर आलाय. खरे वाटतील असे वन्य प्राणी, हजारो दुर्मिळ चित्रांचे कलादालन.
रोज नामांकित गायकांची संगीत मेजवानी. चित्रकार, मूर्तिकार, जादुगार यांची कला, भव्य रांगोळी देखावा, बच्चे कंपनीसाठी मत्सालय, वेगवेगळे सेल्फी झोन. अशा एक ना अनेक गोष्टी आहेत या जत्रेत. ज्या तुम्हाला नक्कीच आपल्याकडे आकर्षित करतील आणि एका वेगळ्या जगाची सैर घडवतील.
खाद्य प्रेमींसाठीही तब्बल ४० प्रकारची व्यंजने, तिन्ही दिवस नामांकित शेफ ह्यांचेकडून विविध प्रकारच्या पदार्थांच्या रेसीपीही सादर केल्या जाणारेत या तीन दिवस चालणा-या "जत्रा-२०१६"मध्ये मग तुम्हीही अवश्य या, या जत्रेत आणि घ्या मज्जा.