११ गोष्टी ज्या फक्त विवाहित महिलाच सांगू शकतात
जर तुम्हाला ही असं वाटतं की लग्नानंतर ही सगळं तसंच असतं जसं सिनेमामध्ये दाखवलं जातं तर तुम्ही चुकीचा विचार करताय. याबाबत तुम्ही विवाहित महिलेला विचारु शकता.
मुंबई : जर तुम्हाला ही असं वाटतं की लग्नानंतर ही सगळं तसंच असतं जसं सिनेमामध्ये दाखवलं जातं तर तुम्ही चुकीचा विचार करताय. याबाबत तुम्ही विवाहित महिलेला विचारु शकता.
लग्नानंतर काय होतं याचं स्वप्न अनेक जण रंगवतात पण तसं न झाल्यास ते निराश होतात. त्यामुळे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या लग्नानंतरच महिला सांगू शकतात त्या तुम्हाला सांगणार आहोत.
१. जर तुम्ही पार्टी, मित्रांसोबत फिरणे या सारख्या गोष्टींना कंटाळून लग्नाचा विचार करताय आणि अशा व्यक्ती बाबत विचार करताय जो नेहमी तुमची काळजी घेईल तर जरा थांबा तुम्ही चुकीचा विचार करताय कारण लग्नानतंर तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढतात आणि त्या सांभाळण्यासाठी जर तुम्ही तयार नसाल तर लग्नाची घाई करु नका.
२. लग्नानतंर सगळ्या गोष्टी बदलतात. तुम्हाला तुमच्या आवडी-निवडी सोडून नात्यांना जपावं लागतं. लोकं तुमच्याकडून १०० टक्केची अपेक्षा करतील पण तुमचा विचा करतीलच असं नाही. त्यामुळे लग्न करतांना ही गोष्ट डोक्यात ठेवा.
३. जर तुम्ही सहनशील नसाल तर लग्नाआधी तुम्ही सहनशील व्हा. कारण लग्नानंतर तुम्हाला किचनमध्ये भरपूर वेळ उभं रहावं लागू शकतं आणि पतीच्या प्रत्येक गोष्टीची ही काळजी घ्यावी लागते.
४. लग्नानतंर अनेकदा असं होतं की तुम्हाला काही गोष्टी जबरदस्ती स्विकाराव्या लागतात. तुम्हाला एखादा व्यक्ती पंसद नसेल तरी तुम्हाला त्याच्या हा मध्ये हा म्हणावं लागेल.
५. लग्नानंतर तुमची लाईफ अधिक रोमँटीक होईल असा विचार जर तुमच्या मनात असेल तर तो चुकीचा आहे. तुमचा पती तुम्हाला रोज किंवा अनेकदा फिरायला घेऊनच जाईल किंवा रोज रोमँटीक गप्पा करेल असं नाही. कधी-कधी छोट्या-छोट्या गोष्टींमुळे पती-पत्नीमध्ये भांडण होतं.
६. लग्नाआधी जर तुम्ही सत्याला सत्य आणि खोटं ला खोटं बोलत असलात तरी लग्नानंतर अनेक मुलींना कुटनितीचा सामना करावा लागतो.
७. जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही लग्नानंतर प्रत्येकाला आनंदी ठेवू शकता तर हा विचार चुकीचा आहे. तुम्ही किती ही सत्य आणि चांगला असाल तरी तुमच्या विरोधात कोणी तरी असतंच याची काळजी घ्या.
८. लग्नानंतर जर तुमची लाईफ अधिक रोमँटीक होईल असं तुम्हाला वाटत असेल तर हे साफ चुकीचं आहे. प्रत्येक क्षण हा रोमँटीक होऊ शकत नाही. अनेकदा पती-पत्नी एकमेकांशी आठवडाभर बोलत नाही.
९. लग्नानंतर कधी-कधी असंही काही महिलांना वाटतं की आपण फक्त नावाचे पती-पत्नी आहोत.
१०. जर तुमच्या नात्यात कटुता आली तर असा विचाक करु नका की काही तरू चमत्कार होईल आणि कटुता दूर होईल त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील.
११. लग्नानंतर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी स्विकाराव्या लागतात ज्या तुम्हाला या आधी कधीच आवडत नव्हत्या. त्यामुळे तुमच्या विचारा सारखंच सगळं होईल असं नाही.
लग्न करण्यापूर्वी सगळ्या गोष्टींची मनात तयारी करुन घ्या. कारण नंतर आपण विचार केलेल्या अनेक गोष्टींमुळे निराशा होते. अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे.