मुंबई : जगातील सर्वात मोठा आनंद हा आई होण्याचा. मात्र, अनेक वेळा हा आनंद दुदैवाने काही महिलांच्या वाट्याला येत नाही. असाच एक प्रकार एका महिलेच्या बाबतीत झाला. लग्नाला ४६ वर्षे झाली तरी मूल नव्हते. या महिलेने प्रयत्न सोडला नाही. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला.


दलजिंदर कौर असे या महिलेचे नाव आहे. १९ एप्रिलला दलजिंदर कौर यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांनी आयव्हीएफ ( In Vitro Fertilisation) म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबीच्या सहाय्याने दलजिंदर कौर आणि मोहिंदर सिंग गिल यांना पूत्रप्राप्ती झाली.
 
७३ वर्षीय मोहिंदर सिंग गिल मुल होण्यासाठी २०१३पासून प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीसोबत अमृतसरपासून ते हिसारपर्यंत प्रवास केला. आपल्या पत्नीला व्यवस्थित उपचार मिळावेत यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. याअगोदर दोनवेळा दलजिंदर कौर यांनी टेस्ट ट्यूब बेबीच्या सहाय्याने आई होण्याचा प्रयत्न केला होता. यश आले नाही. जुलै महिन्यात त्यांच्यावरील ‘टेस्ट ट्यूब बेबी’ प्रक्रिया यशस्वी झाली.