मुंबई: प्रत्येक भारतीय स्त्रीच्या पायात पैंजण असतात. भारतीय संस्कृतीत पैंजणाला स्त्रीच्या सुंदरतेचे प्रतिक मानले जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाच्या वेळी सासरकडून भेट म्हणून नवरीला पैंजण दिले जातात. स्त्रीयांना पैंजण घालण्याचं कारण विचारल्यावर छान दिसण्यासाठी किंवा श्रृंगार आहे हा पैंजण घालाव्याचं लागतात असं उत्तर कायम आपण ऐकत असतो.


श्रृंगारातील पैंजणामुळे प्रत्येक स्त्री सुंदर दिसतेच, पण तिच्या पैंजणाने दैवी शक्ती आकर्षित होते त्यामुळे घरात सुख-समृध्दीची भरभराट होऊन आनंददायी वातावरणाची निर्मिती होते. 


घुंगरांच्या गोड आवाजाने घरात येणारी नकारत्मक शक्तींवर रोख लागते. आणि घरात सकारत्मक दुष्टीकोन निर्माण होतो.


पैंजण नेहमी सोने किंवा चांदीच्या धातूने बनवलेली असते, या धातूंमुळे पायाचे घर्षण होऊन पाय मजबूत होतात. 


धार्मिक आधारांवर पैंजण पवित्र मानली जाते, म्हणून स्त्रीया पैंजण घालतात.