पती-पत्नीतील वाद टाळण्यासाठी लक्षात ठेवा या ३ गोष्टी

हल्ली पती आणि पत्नी दोघेही काम करत असल्याने त्यांना एकमेकांना वेळ देणे तितकेसे शक्य होत नाही. एकमेकांशी पुरेसे लक्षही दिले जात नाही. हेच कारण पती आणि पत्नीमधील वादास अनेकदा कारणीभूत ठरते. अनेकदा तर हा वाद इतका विकोपाला जातो की त्यांच्यात घटस्फोटही होतात. हे वाद टाळण्यासाठी खालील ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
मुंबई : हल्ली पती आणि पत्नी दोघेही काम करत असल्याने त्यांना एकमेकांना वेळ देणे तितकेसे शक्य होत नाही. एकमेकांशी पुरेसे लक्षही दिले जात नाही. हेच कारण पती आणि पत्नीमधील वादास अनेकदा कारणीभूत ठरते. अनेकदा तर हा वाद इतका विकोपाला जातो की त्यांच्यात घटस्फोटही होतात. हे वाद टाळण्यासाठी खालील ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
१. एकमेकांचा सन्मान करा - पती आणि पत्नी हे जरी एकमेकांचे जीवनसाथी असले तरी ते दोघेही एक स्वतंत्र व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांनी एकमेकांचा सन्मान करणे गरजेचेच असते. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये तर अनेकदा महिलांना पुरुषांना योग्य तो सन्मान मिळत नाही. पत्नीवर सतत रागावणे, अपशब्द बोलणे वा हात उगारणे यामुळे पत्नीचा पतीबाबतचा सन्मान कमी होतो. यावेळीही दोघेही एकमेकांबाबत नकारात्मक विचार करु लागतात. याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होतो.
२. भावनांना समजून घ्या - रिलेशनशिप टिकवण्यासाठी समोरच्या व्यक्तींच्या भावनांना समजून घेणे तितकेच गरजेचे असते. पती-पत्नीचे नाते प्रेम आणि विश्वासावर टिकते. त्यामुळे त्या दोघांनी एकमेकांच्या भावना केवळ समजूनच घ्यायला नकोत तर त्यांचा सन्मानही केला पाहिजे.
३. एकमेकांना वेळ देणे - हल्लीची लाईफस्टाईल इतकी जलद झालीये की कोणाला वेळच मिळत नाही. पती आणि पत्नी वर्किंग असतील तर नोकऱ्यांमुळे त्यांना एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही. यामुळे नात्यात दुरावा येण्याची शक्यता असते. अशावेळी एकमेकांसाठी वेळ काढणे गरजेचे असते. नात्यांना पुरेशा वेळेचे खतपाणी दिलं की नात्याला गंज चढत नाही.