मुंबई : हल्ली स्वस्तात मस्त स्मार्टफोन देण्याकडे अधिकाधिक कंपन्यांचा कल असतो. ग्राहकांना कमी किंमतीत अधिक फीचर्स असलेले स्मार्टफोन देण्याकडे कंपन्यांचा कल असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिनी कंपनी अल्काटेलने नवा स्मार्टफोन बाजारात आणलाय. सामान्या माणसाच्या खिशाला परवडेल अशीच किंमत कंपनीने या स्मार्टफोनची ठेवलीये. अल्काटेलचा स्ट्रीक या स्मार्टफोनची किंमत केवळ २९.९९ डॉलर्स म्हणजे २००५ रूपये इतकी ठेवलीये.


सध्या केवळ अमेरिकेत या स्मार्टफोनची विक्री सुरु आहे. दरम्यान, लवकरच हा स्मार्टफोन अन्य देशांत दाखल होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड ६.० मार्शमेलो ओएस, १ जीबी रॅम, ४.५ इंचाचा डिस्प्ले, ८ जीबी इंटरनल मेमरी ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ५ एमपी फोकस रेयर कॅमेरा तर २ एमपीचा फ्रंट कॅमेरा या सुविधा आहेत.