मुंबई :  सोशल मीडियाच्या काळात आता पर्सनल गोष्टी लपवणं कठिण झालं आहे. अनेकांना देखील इतरांच्या गोष्टी जाणून घेण्यात अधिक रस असतो. सगळेच लोक तुमचे हितचिंतक असतील असं नाही. त्यामुळे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधीत कोणाकडे सांगितल्या नाही पाहिजे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. जन्मतारीख : अनेकांना तुमचे वय किती आहे हे जाणून घेण्याची फारच उत्सुकता असते. कोणी कितीही वेळा विचारण्याचा प्रयत्न केला तर आपले वय कोणाला सांगू नका. कारण अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांवर तुमचं वय सांगावं लागतं किंवा दिलेलं असतं. 


२. संपत्ती : तुमच्याकडे किती संपत्ती आहे हे कधीच कोणाला सांगू नका. अनेकांना तुमचं इनकम देखील जाणून  घेण्याची उत्सूकता असते. त्यामुळे कोणालाही या गोष्टी सांगणे टाळाच. मित्र आणि नातेवाईकांना देखील तुमचं इनकम सांगू नका. 


३. कौटुंबिक गोष्टी :  अनेक लोकं वैयक्तिक जीवनातील गोष्टी आपल्या मित्रांसोबत किंवा नातेवाइकांसोबत शेअर करत असतात. अशाने त्याला हलकं वाटतं असाही त्यांचा तर्क असतो. पण असे केल्याने नंतर पछतावा होतो हे लक्षात ठेवा. घरातील गोष्टी घरातच राहू द्यावा. कुटुंबातील लोकांचे स्वभाव, त्यांच्या आपल्याला आवडत नसलेल्या गोष्टी, आपसातील भांडणं हे काहीही बाहेर शेअर करू नये. 


४.  दान :  तुम्ही जे दान करता ते गुप्त ठेवा. तर लाभ मिळतो. गुप्त दान केल्याची नोंद देवाकडे असते म्हणून स्वत:चे कौतूक करण्याने त्या दानचे फल निष्फल होऊन जातं. गरिबांना जेवू घाला, अनेक पुण्य काम करा पण याचे स्वत:च्या तोंडून व्याख्या करू नका.


५. कमजोरी : अनेकदा कमजोरी गुप्त ठेवणे फायद्याचे ठरते.  अनेक लोक तुमच्या कमजोरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. अयोग्यता आणि कमजोरी यातील फरक समजून ते इंतरांना सांगतांना विचार करा.