मुंबई : आज प्रेम होणं ही काही मोठं आणि अगदीच वेगळी गोष्ट राहिलेली नाही. अनेक जण आज रिलेशनशिप मध्ये राहतायंत. पार्टनरवर अनेकांचं खूप प्रेम असतं पण हाच पार्टनर जेव्हा तुमचा विश्वासघात करतो तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त दुख: होतं. प्रेमात अनेक जण इतके आंधळे होऊन जातात की आपला पार्टनर आपल्याला धोका देतोय हे ही कळत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५ गोष्टी सांगतात की पार्टनर धोका देणार आहे


१. तुमचा पार्टनर जेव्हा अनैतिक संबंधाबाबत सकारात्मक बोलत असेल म्हणजेच मित्र किंवा मैत्रिनीसोबत संबंध ठेवण्यास गैर नाही असं जर पार्टनर म्हणत असेल तर तो तुम्हाला धोका देणार आहे.


२. तुमचा पार्टनर जर मित्र किंवा मैत्रिनीबाबत जास्त बोलत असेल किंवा अफेअरबाबत बोलत असेल तर तो तुम्हाला धोका देण्याच्या तयारीत आहे.


३. फक्त शारिरीक संबंध ठेवण्यासाठी अफेयर ठेवले जातात असं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे.


४. जेव्हा एखाद्याला दुसऱ्यासोबत अफेअर ठेवायचे असल्यास तो सेक्सबाबत पार्टनरसोबत बोलत असतो.


५. एखाद्या वेळेस जर पार्टनरचे दुसऱ्या सोबत अफेअर असेल तर मग पार्टनर तुमच्या सोबत भांडण करण्यासाठी अनेक विषय काढतो ज्यामुळे तुमच्यात ब्रेकअप होईल.