५१ वर्षीय महिलेची कहाणी होतेय व्हायरल
ही कहाणी आहे मुंबईत राहणाऱ्या ५१ वर्षीय कॉलेज स्टुडंट महिलेची. Humans of Bombayच्या फेसबुक पेजवर या महिलेची कहाणी पोस्ट करण्यात आली. मात्र अवघ्या काही तासातच ही पोस्ट तब्बल साडेसात हजाराहून अधिक वेळा शेअर करण्यात आलीये.
मुंबई : ही कहाणी आहे मुंबईत राहणाऱ्या ५१ वर्षीय कॉलेज स्टुडंट महिलेची. Humans of Bombayच्या फेसबुक पेजवर या महिलेची कहाणी पोस्ट करण्यात आली. मात्र अवघ्या काही तासातच ही पोस्ट तब्बल साडेसात हजाराहून अधिक वेळा शेअर करण्यात आलीये.
१२वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तब्बल ३० वर्षांनी डिग्रीचे शिक्षण घेण्याची संधी या महिलेला मिळाली. शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल या महिलेचे कौतुक केले जातेय.
१२ वी झाल्यानंतर मला माझे शिक्षण सोडावे लागले. यादरम्यान माझे लग्न झाले. सासरी आमचे एकत्र कुटुंब आहे. त्यामुळे १२वी नंतर शिक्षण पूर्ण करण्यास वेळच मिळाला नाही. मात्र डिग्री मिळवण्याची माझी इच्छा कायम होती, असे त्या महिलेने सांगितले. दरम्यान, या महिलेचे नाव पोस्टमध्ये देण्यात आलेले नाहीये.
शिक्षणाच्या इच्छेमुळे त्यांनी त्यांच्या तीनही मुलांना क्लासेसमध्ये पाठवण्यापेक्षा घरातच शिकवले. मात्र २०१३ मध्ये मुलांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी डिग्रीसाठी अॅडमिशन घेतले. त्यावेळी त्या ५१ वर्षांच्या होत्या. यंदाचे वर्ष त्यांचे डिग्रीचे अखेरचे वर्ष आहे आणि शेवटच्या वर्षातील परीक्षाही जवळ आल्यात. शिक्षण मिळवण्याची त्यांची इच्छा आणि मेहनत पाहून शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते हे या उदाहऱणावरुन पुन्हा एकदा सिद्ध झालेय.