मुंबई : दिवसेंदिवस सोशल मीडियाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढत चाललीये. तात्काळ प्रसिद्धीचे तसेच पैसे कमावण्याचे साधन म्हणून सोशल मीडियाकडे पाहिले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक चिमुरडा आपल्या क्रिएटिव्हीटीद्वारे यूट्यूबवर स्टार बनलाय.त्याच वय आहे केवळ 6 वर्षे मात्र इतक्या कमी वयात तो यूट्यूबर सेलिब्रेटी बनलाय. 


ज्या वयात मुलांना कळतही नाही की काय खावे वा काय खाऊ नये त्या वयात निहाल कुकिंग करतोच. इतकंच नव्हे तर त्याच्या यूट्यूबवरील व्हिडीओला अनेक हिट्सही मिळतात. एका शोद्वारे तो लाखो रुपये कमावतोही.


निहालचे निकनेम किचा आहे आणि त्याच्या यूट्यूब चॅनेलचे नावही KichaTube - "The Little Chef" असे आहे.