मुंबई : व्हॅलेंटाईन डेचं आकर्षक तरुणांमध्ये हे अधिक असतं. त्यामुळे व्हॅलेंटाइन विक सुरू झाला की तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. व्हॅलेंटाइन डे ला बाजारातही अनेक आकर्षक वस्तू उपलब्ध आहेत. वेगेवेगळ्या गिफ्टला तरुणांची पंसती असते. सध्या बाजारात काय ट्रेंड आहे. कोणत्या गिफ्टला अधिक मागणी आहे. कोणते गिफ्ट तुम्ही तुमच्या जोडीदाराला देऊ शकता. या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. हार्डडिस्क : खास 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने हार्डडिस्कचा देखील एक उत्तम भेटवस्तू म्हणून विचार केला जाऊ शकतो. प्रियकराला ही गोष्ट तुम्ही भेट देऊ शकता. याचा उपयोग देखील चांगला होतो.


२. दागिने : आकर्षक आणि मनमोहक अशा दागिन्यांची निवड आपण भेट म्हणून करु शकतो. तुमच्या जोडीदाराला तुम्ही ही भेटवस्तू देऊ शकता. 


३. लॉकेट : हृदयाच्या आकाराचे रोमँटिक लॉकेट 'व्हॅलेंटाईन डे'साठी आकर्षणाचा विषय असतो. त्यामुळे आधीपासूनच नियोजन करून तुम्ही चांगलं आकर्षक लॉकेट शोधू शकतो.


४. गाऊन : डिझायनिंग केलेल्या सुंदर लाल रंगाच्या गाऊन किंवा टॉप तुम्ही तुमच्या प्रेयसीला भेट देऊ शकता. 


५. उशी : लाल रंगांचे बेड कव्हर, आकर्षक रंगांच्या उशा, ब्लँकेट, शाल अशा काही अनोख्या भेट वस्तूंना देखील प्राधान्य देता येईल. तुम्ही आकर्षक असे दिलच्या आकाराचे पिलो सुद्धा भेट देऊ शकता.


६. नेकलेस : बाजीराव-मस्तानी अंदाजातील दागिने सध्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. तुमच्या जोडीदाराला त्या नक्कीच आवडतील.


७. घड्याळ : व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने घड्याळ देखील बाजारात उपलब्ध आहेत. व्हॅलेंटाईन भेट म्हणून ही घड्याळं देऊन आपण आपल्या जोडीदाराला खुश करू शकता. 


८. स्कार्फ : तुमच्या प्रेयसीसाठी फॅशनेबल स्कार्फहा सुद्धा चांगला पर्याय ठरू शकतो.