नोटाबंदीनंतर तीन दिवसांत एक लाख आयफोनची विक्री
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र तुम्हाला माहीत आहे का मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर आणखी कशाची विक्री वाढली?
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र तुम्हाला माहीत आहे का मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर आणखी कशाची विक्री वाढली?
नोटाबंदीनंतर सोन्याच्या विक्रीसोबतच आयफोनच्या विक्रीतही मोठी वाढ पाहायला मिळाली. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार नोटाबंदीनंतर तीन दिवसांत तब्बल एक लाखाहून अधिक आयफोनची विक्री झाली. हा आकडा एकूण महिन्यातील विक्रीपैकी तीन चतुर्थांश इतका आहे.
अनेकांनी आपल्याकडील पैशाचा वापर करण्यासाठी आयफोनची खरेदी केली. तसेच दुकानदारांनीही जुनी बिले देत या तेजीचा संपूर्ण फायदा उचलला. दिवाळीनंतर महागड्या स्मार्टफोनची विक्री कमी होते. यातच नोटाबंदीनंतर अचानक विक्री वाढल्याचा फायदा दुकानदारांना झाला.