मुंबई : लग्न ही पायरी प्रत्येकाच्या जीवनात येतेच. मात्र तुम्हाला माहीत आहे का लग्नासाठी मुलगा आणि मुलीच्या वयात किती अंतर असावे? अनेकदा आपण ऐकतो की नवरा मुलगा ५० वर्षांचा तर वधू २२ वर्षांची. वयात खूप अंतर असल्याने अनेकदा त्याचा परिणाम वैवाहिक जीवनावर होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमोरी विद्यापीठाचे अँड्र्यू फ्रान्सेस आणि ह्युगो मिआलोन यांनी केलेल्या संशोधनातून वयामध्ये किती अंतर असावे याबाबतची माहिती समोर आलीय. त्यांनी केलेल्या संशोधनात ३००० जोडप्यांनी भाग घेतला होता. 


संशोधनानुसार, वयात जितके अंतर जास्त तितके लग्न तुटण्याचे प्रमाण अधिक असते. जर मुलगा-मुलगीमध्ये वयाचे अंतर ५ वर्षांपर्यंत असेल तर विवाह मोडण्याचे प्रमाण १८ टक्क्यांनी वाढते. जर लग्न ठरलेल्या जोडप्यांमध्ये वयाचे अंतर १० वर्षे असेल तर लग्न मोडण्याची शक्यता ३९ टक्क्यांनी वाढते. 


जर मुलगा आणि मुलगी यांच्यात एक वर्ष आणि त्याहून कमी अंतर असेल लग्न मोडण्याची शक्यता फक्त ३ टक्के इतकी असते.