खुशखबर : `एअरसेल`वर व्हॉईस कॉल आणि डेटा मोफत!
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना जोरदार पद्धतीनं बाजारात उतरावं लागलंय. या पार्श्वभूमीवरच `एअरसेल`नं आपल्या ग्राहकांसाठी दोन जबरदस्त ऑफर लॉन्च केल्यात.
मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना जोरदार पद्धतीनं बाजारात उतरावं लागलंय. या पार्श्वभूमीवरच 'एअरसेल'नं आपल्या ग्राहकांसाठी दोन जबरदस्त ऑफर लॉन्च केल्यात.
या ऑफर्समध्ये ग्राहकांना अनलिमिटेड टेडा आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळेल. कंपनीनं RC 14 आणि RC 249 सादर केलेते.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, RC 249 ऑफरमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड फ्री कॉल्स तसंच अनलिमिटेड टूजी टेडा मिळू शकेल. इतकंच नाही तर, फोर जी ग्राहकांना १.५ जीबी अतिरिक्त फोर जी डेटाही मिळू शकेल. हा प्लान २८ दिवसांसाठी वैध राहील.
तर RC 14 ऑफरमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा एका दिवसासाठी मिळू शकेल.
याशिवाय, कंपनीनं याआधी केलेल्या FRC 148 ऑफरनुसार, ग्राहकांना 148 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर ९० दिवसांसाठी फ्री एअरसेल टू एअरसेल कॉल मिळतील.