मुंबई : रिलायंस जिओनंतर सगळ्याच कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्याच कंपन्या आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. एअरसेलने देखील ग्राहकांसाठी आता नवी ऑफर आणली आहे. २३ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा नवा प्लान एअरसेलने लॉन्च केली आहे. त्याची वॅलेडिटी एक दिवसाची असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरसेल कस्‍टमर्ससाठी फ्री डेटा आणि एक महिन्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर देखील आणली आहे. एअरसेलचे २३ रुपयात अनलिमिटेड कॉलिंग शिवाय आणखी काही ऑफर्स लवकरच आणणार आहेत.


एअरसेलने २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंकसाठी स्‍पेशल ऑफर लॉन्च केली आहे. त्यासाठी तुम्हाला ३४८ रुपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे.


ग्राहकांसाठी लोकल आणि STD कॉलिंगसाठी देखील अनलिमिटेड कॉलची ऑफऱ आणली आहे. सोबतच फ्री डेटा सुविधा देखील दिली जाणार आहे.


३४८ रुपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5 GB डेटा देखील मिळणार आहे.


4G इनेबल्‍ड स्‍मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी १.५ जीबी ३जी डेटा फ्री मिळणार आहे. तर इतर ग्राहकांना 500 MB मोबाइल डेटा फ्री मिळणार आहे.


अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री डेटाची ऑफर २८ दिवसांसाठी असणार आहे.