नवी दिल्ली : भारतामध्ये एअरटेलच्या 4G चा स्पीड हा सर्वात जास्त आहे. ट्रायनं दिलेल्या रिपोर्टमध्ये ही गोष्ट समोर आली आहे. ट्रायनं दिलेल्या रिपोर्टनुसार एअरटेलचा स्पीड 11.4 एमबीपीएस, रिलायन्स कम्युनिकेशनता 7.9 एमबीपीएस, आयडीयाचा 7.6 एमबीपीएस आणि व्होडाफोनचा 7.3 एमबीपीएस आहे. यामध्ये रिलायन्स जीओचा स्पीड सर्वात कमी म्हणजेच 6.2 एमबीपीएस एवढा आहे. त्यामुळे मोठा गाजावाजा करत 4G सुरु करणाऱ्या रिलायन्स जीओचा दावा फोल ठरला आहे.