मुंबई : आयडियाच्या ग्राहकांपाठोपाठ आता एअरटेल्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. एअरटेल आता त्यांच्या प्रीपेड इंटरनेट प्लॅनवर 25 टक्के ते 67 टक्के जास्त डेटा देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

655 रुपयांचा 4G/3G डेटा पॅकमध्ये आता 5 GB डेटा मिळणार आहे. याआधी एवढ्याच रुपयांमध्ये 3 GB डेटा मिळत होता. याचबरोबर 455 रुपयांच्या 4G/3G डेटा पॅकमध्ये 50 टक्के जास्त म्हणजेच 3 GB डेटा मिळणार आहे, याआधी या प्लॅनमध्ये 2GB डेटा मिळायचा. 989 रुपयांच्या 4G/3G पॅकमध्ये 6.5 GB ऐवजी आता 10 GB डेटा मिळणार आहे. 


याबरोबरच एअरटेल कूपनच्या सुविधेवरही जास्त डेटा मिळणार आहे. 25 रुपयांच्या 2G पॅकमध्ये आता 45 टक्के जास्त डेटा मिळणार आहे. तर 145 रुपयांच्या 4G/3G पॅकमध्ये 32 टक्के जास्त डेटा मिळेल. 5 रुपयांच्या एक दिवसाच्या कुपनवर 48 टक्के जास्त म्हणजेच 30 MB डेटा मिळणार आहे.