मुंबई : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी एअरटेलने माय प्लॅन इनफिनिटी अंतर्गत दोन नव्या पोस्टपेड योजनेची घोषणा केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरटेलकडून ग्राहकांना १,१९९ रुपयांमध्ये अनलिमिटेड फोन कॉलची सुविधा मिळणार आहे. तर १.,५९९ रुपयांत थ्रीजी/फोरजी कॉलिंगसोबत डेटा पॅकचीही सुविधा देण्यात आलीये.


१,१९९रुपयांच्या या नव्या प्लॅनमध्ये ग्राहक अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंग कॉलचा आनंद उठवू शकता. तसेच १०० फ्री एसएमएस, १ जीबी थ्रीजी/फोरजी डेटा आणि फ्रीमध्ये विंक म्युझिकची सुविधा देण्यात आलीये.


तर १,५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉलिंग, एसएमएस आणि विंक म्युझिकची सुविधा सारखीच मिळते. मात्र यात ५ जीबी थ्रीजी/फोरजी डेटा दिला जातो.