मुंबई : एअरटेल या प्रसिद्ध टेलिकॉम कंपनीने देशभरात रोमिंग फ्रीची घोषणा केली आहे. ही योजना जिओला तोड देण्यासाठी एअरटेलने उचलेलं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे. रिलायन्स जिओने प्रस्थापित टेलिकॉम कंपन्यांना हादरे दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओच्या आगमानानंतर ४ महिन्यात अनेक कंपन्यांनी आपले व्हॉईस कॉलिंग आणि डेटा प्लॅन बदलावे लागले आहेत. तसेच आणि त्यात नवनव्या ऑफर्स जाहीर कराव्या लागल्या आहेत. देशभरात रोमिंग फ्रीची घोषणा एप्रिलपासून लागू होणार आहे.


व्हॉईस कॉलवर रोमिंग चार्जेस आकारले जाणार नाहीत, तसेच डेटा वापरावरही रोमिंग चार्जेस आकारले जाणार नाहीत. देशभरात एअरटेलचे २७ कोटी ग्राहक आहेत. या ग्राहकांनी देशभरात कुठेही रोमिंग चार्जेस द्यावे लागणार नाहीत. 


जिओच्या देशभरातील मोफत कॉलच्या ऑफरचा परिणाम म्हणून एअरटेलच्या या घोषणेकडे टेलिकॉम क्षेत्रात पाहिलं जातं आहे. एअरटेलचे ग्राहक देशभारत कुठेही असले, तरी इनकमिंग कॉल आणि एमएमसही मोफत असेल. 


भारतातून परदेशात गेल्यावरही एअरटेलच्या कॉलवर सवलत मिळणार आहे. देशातील प्रस्थापित टेलिकॉम कंपन्यांनी रिलायन्स जिओच्या नव्या घोषणामुळे धक्का बसला आहे.


देशभरात कुठूनही कुठेही कॉल केल्यास लोकल चार्जेसनुसारच पैसे आकारले जातील, तसेच डेटाबाबतही हीच ऑफर लागू असेल.  नॅशनल रोमिंग चार्जेस बंद केल्यानंतर आता देश एक 'लोकल नेटवर्क' बनणार आहे, असं एअरटेलचे एमडी आणि सीईओ गोपाल विठ्ठल यांनी म्हटलं आहे.