अॅमेझॉनवर पुन्हा तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप
दिल्लीतील भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून, या सर्व प्रकाराबाबत टीका करत अॅमेझॉनविरोधात हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून या सर्व प्रकाराबाबत टीका करत अॅमेझॉनविरोधात हल्लाबोल केला आहे.
अॅमेझॉनच्या वेबसाइटवर विक्रीसाठी असलेल्या स्टिकरमध्ये भारताचा काही हिस्सा पाकिस्तान आणि चीनमध्ये असल्याचं दाखवण्यात आला आहे. तर भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा भाग वगळल्याचेही निदर्शनास आले आहे.
याशिवाय अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटने पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.