मुंबई : वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या अॅमेझॉन या वेबसाईटवर बहिष्कार टाकण्यासाठी सोशल नेटवर्किंगवर मोहीम सुरु झाली आहे. #BoycottAmazon हा हॅशटॅग सोशल नेटवर्किंगवर ट्रेन्डिंगमध्ये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅमेझॉनच्या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या पायपुसण्यांवर देवीदेवतांचे फोटो असल्यामुळे सोशल नेटवर्किंगवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पायपुसण्यांवर हिंदू देवी-देवता तसंच जिसस आणि कुराण यांचे फोटोही वापरण्यात आले आहेत.