आता एटीएममधून मिळणार पिझ्झा
वॉशिंग्टन : आतापर्यंत एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची सोय होती मात्र आता या मशीनमधून चक्क पिझ्झा मिळणार आहे. अमेरिकेत हे एटीएम लावण्यात आलंय. यापुढे अमेरिकन नागरिकांना पिझ्झा खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही. कारण आता पिझ्झा एटीएम मधूनही मिळणार आहे.
ओहयो येथील झेवियर्स विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हे एटीएम सर्वप्रथम लावण्यात आले आहे. या एटीएममधून 12 इंचाचा पिझ्झा मिळू शकेल. ऑर्डर दिल्यानंतर अवघ्या 3 मिनिटांत पिझ्झा मशिनमधून बाहेर येईल. यासाठी क्रेडिट अथवा डेबिट कार्डने पैसे भरण्याची सोय आहे. शिवाय तापमान अनुकूलित रेफ्रिजरेशन सिस्टमही लावण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना ताजा आणि गरम पिझ्झा मिळू शकेल.
या टचस्क्रीन एटीएमची सुरूवात 10 ऑगस्टपासून होणार आहे. यामध्ये एका पिझ्झाची किंमत 10 अमेरिकन डॉलर इतकी आहे.