मुंबई : जगभरात तरूणांना सगळ्यात जास्त आकर्षित करणारा स्मार्टफोन म्हणजे आयफोन. पण आयफोनच्या चाहत्यांनो तुम्हाला माहितेय का की याच आयफोनचा पहिला लोगो कोणता होता ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसा होता अॅपलचा पहिला लोगो ?


अॅपल या कंपनीच्या पहिल्या लोगोमध्ये न्यूटन एका झाडाखाली वाचत बसला आहे आणि त्याच्यावर सफरचंद लटकत आहे. हा लोगो पूर्णत: ब्लॅक अॅण्ड व्हाईट रंगात होता.


लोगोच्या बार्डरवर "न्यूटन.... एक मन.... कायमचे विचित्र समुद्रांच्या विचारधारात बुडून एकटेच प्रवास करणारे..." असे लिहिलेले होते.


अॅपलचे तिसरे सहसंस्थापक म्हणून मानण्यात येणाऱ्या रोनाल्ड वेन यांनी १९७६ मध्ये हा लोगो डिझाइन केलेला. १९९८ मध्ये मात्र तो बदलून आताचा लोगो बनविण्यात आला.