एटीएम कार्ड वापरणाऱ्यांनो या फोनपासून सावधान !
तर अजिबात त्याची माहिती देऊ नका.
मुंबई : आज प्रत्येकाकडे एटीएम आहे. अनेक जण एटीएम कार्डच्या माध्यामातूनच व्यवहार करत असतात. पण आम्ही तुमची फसवणूक होऊ नये म्हणून काही महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत. तुम्हाला जर तुमच्या एटीएम कार्डची माहिती विचारणारा फोन आला तर अजिबात त्याची माहिती देऊ नका.
तर तुमचीही होऊ शकते फसवणूक
तुम्हाला अशा फोनपासून सावध राहण्याची गरज आहे जे तुम्हाला तुमच्या एटीएमकार्ड विषयी माहिती विचारतात. मुळात बँक अशी कोणतीही माहिती फोनवर विचारत नाही किंवा फोन करत नाही. त्यामुळे असे फोन आल्यास त्यांना कोणतीही माहिती देऊ नका. कोणतीही समस्या असल्यास थेट बँकेत संपर्क साधा.
एटीएमकार्ड, पिन, खाते नंबर सांगू नका
अकाऊंट नंबर, एटीएम नंबर, एटीएम पिन, पासवर्ड असे कोणत्याही नंबरची जर तुम्हाला फोनवर विचारणा केली तर ते अजिबात सांगू नका यामुळे तुमच्या खात्यातील रक्कम यामुळे तुम्हाला नकळता गायब होऊ शकते म्हणजेच ती चोरली जावू शकते.
थेट बँकेशी करा संपर्क
आजवर अनेकांना अशा प्रकारच्या अनोळखी व्यक्तींचे फोन आले आहेत आणि यामधून त्यांची फसवणूक झाली आहे. तुमचं एटीएम कार्ड हरवलं तरी लगेचच बँकेत जावून किंवा बँकेच्या हेल्पलाईन नंबरवर फोन करुन तुमचं एटीएम ब्लॉक करण्यास सांगा. बँकेतही तुमचा एटीएम पिन नंबर कधीच विचारला जात नाही याची नोंद घ्या.
आजवर अनेक फेक आणि फसवणूक करणारे फोन मोठ्या प्रमाणात येत आहेत. अशा फोन पासून सावध राहणं गरजेचं आहे. तुम्हालाही असे कोणतेही फोन आल्यास त्याबाबत पोलिसात किंवा सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल करा.