नवी दिल्ली : भारतीय टू व्हिलर कंपनी आपल्या ताफ्यात एका नव्या पल्सर बाईकचा समावेश करण्यासाठी सज्ज झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बजाजची क्रूज स्पोर्ट पल्सर CS ४०० लवकरच बाजारात येण्याची चिन्हं आहेत. तसं सुतोवाच बजाज बिझनेस डेव्हलमेंटचे अध्यक्ष एस रविकुमार यांनी केलंय. 


पल्सर CS ४०० सर्वात पहिल्यांदा ऑटो एक्स्पो २०१४ मध्ये सादर करण्यात आली होती. रविशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत बजाजच्या प्लॅटिनाचं अपडेटेड व्हर्जन तसंच नवीन टॉप एन्ड पल्सर लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. हे टॉप एन्ड प्लसर म्हणजेच पल्सर CS ४०० असल्याचं सांगण्यात येतंय. 


कशी आहे पल्सर CS ४००
या बाईकमध्ये ३७३.४ सीसीचं सिंगल सिलिंडर इंजिन वापरण्यात आलंय. यामध्ये लिक्विड कूलसोबत फ्युएल इंजेक्शनही देण्यात आलंय. असं इंजिन केटीएम ड्युक ३९० मध्ये देण्यात आलंय.