न्यूयॉर्क : जगातला सर्वात श्रीमंत माणूस आणि मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल  गेटस यांनी एक महत्त्वाची घोषणा केलीय. बिल गेटस त्यांची सगळी संपत्ती  सामाजिक संस्थांना दान करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी माझ्या मुलांना संपत्ती देणार नाही तर ती दान करणार आहे, अशी घोषणा त्यांनी केलीय. टीव्हीवरच्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी ही घोषणा केली. बिल गेटस यांची आताच्या घडीला  5.45 लाख कोटी इतकी संपत्ती आहे. 


बिल गेटस यांना 20 वर्षांची जेनिफर, 17 वर्षांचा रॉरी आणि 14 वर्षांची फीबी अशी तीन मुलं आहेत. त्यांना आपण उत्तम दर्जाचं शिक्षण देऊ पण संपत्ती देणार नाही.


मुलांना थोडे पैसे नक्कीच देऊ पण त्यांनी बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहावं, त्यांना जास्त पैसा दिला तर उलट ते स्वतःचं करीअर घडवू शकणार नाहीत, असं बिल गेटस म्हणालेत. 


बिल गेटस त्यांची सगळी संपत्ती बिल अँड मेलिंडा गेटस् फाऊंडेशन या त्यांच्या संस्थेला देणार आहेत. ही संस्था जगभरात शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीनं अनेक उपक्रम राबवते.