लयभारी बॉनअव्हील क्लासिक सुपर बाईक
स्टाईल, वेग, कम्फर्ट आणि 1000 CC चं इंजिन अशा विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी बॉनअव्हील क्लासिक ही बाईक पुणेकरांना उपलब्ध झाली आहे.
पुणे : स्टाईल, वेग, कम्फर्ट आणि 1000 CC चं इंजिन अशा विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी बॉनअव्हील क्लासिक ही बाईक पुणेकरांना उपलब्ध झाली आहे.
पुण्याच्या पाषाणमधल्या बी यू भंडारी ऑटोमोटीव्ह प्रायव्हेट लिमिटेडमध्ये या बाईकच नुकतंच लाँचिंग करण्यात आलं. कोणत्याही बाईक वेड्याच स्वप्न असत TRIUMPH (ट्रायम्फ) ही बाईक खरेदी करण्याचं. आता याच BONNEVILLE (बॉनअव्हिल) CLAASIC चे अत्याधुनिक रूप असलेली STREET TWIN पुण्यात उपलब्ध झालीय.
पुण्यातल्या बाईक वेड्यांना TRIUMPH (ट्रायम्फ) च्या बी यु भंडारी शो रूम ने ही संधी दिलीय… पाषाण मधल्या बी यु भंडारी शो रूम मध्ये STREET TWIN च्या विविध रंगांमध्ये मोडेल्स सध्या उपलब्ध झाली आहेत. त्याच लॉन्चींग नुकतच पार पडलं…!
अत्याधुनिक तंत्रज्ञान वेगाशी स्पर्धा करण्याची क्षमता, स्टाइलीश लूक, कम्फर्ट या सर्वच पातळ्यांवर उत्कृष्ट असणारी ही बाईक अनेकांच्या पसंतीस उतरलीय !
STREET TWIN ची अनेक रंगांमधील मॉडेल्स बी यु भंडारी शो रूममध्ये उपलब्ध आहेत. अगदी ६७५ सी सी पासून २२०० सी सी पर्यंत TRIUMPH (ट्रायम्फ) ची मॉडेल्स उपलब्ध आहेत. आकर्षक रंग, स्टाईल या मूळ कोणत्याही बाईक वेड्याच्या मनाला या गाड्या भुरळ घालतायेत.