मुंबई : नोटा बंदीनंतर रांगेत उभं राहण्यासाठी अनेकांना वेळ नाही, किंवा कंटाळा येतो, तेव्हा तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीय. कारण www.bookmychotu.com वर जाऊन तुम्हाला याविषयी मदत मिळू शकते. 


या वेबसाईटवरून ताशी ९० रूपयाने छोटू तुमची मदत करणार आहे, छोटू रांगेत उभं राहण्याचा तुमचा त्रास वाचवणार आहे. तसेच छोटूला तुम्ही इतर लहान मोठी कामंही सांगू शकणार आहेत, यासाठी छोटू तुमच्याकडून तासाला ९० रूपये घेणार आहे. अधिक माहितीसाठी लॉग इन करा www.bookmychotu.com.