मुंबई : या जगात पहिले अंडे आले की पहिली कोंबडी याचे उत्तर आजतायगत कोणाला देता आलेले नाहीये. तुम्हालाही हा प्रश्न कोणीतरी नक्कीच विचारला असेल. त्यावेळी तुम्हाला उत्तर देता आले नसेल. मात्र आता याचे उत्तर सापडलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटिश वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात हे उत्तर समोर आलेय. त्यांनी केलेल्या अभ्यासातून पहिली कोंबडी आली होती हे उत्तर समोर आलेय. 


शेफील्ड आणि वारविक युनिर्व्हसिटीच्या शास्त्रज्ञांनी हे उत्तर शोधून काढलंय. रिसर्ट रिपोर्टनुसार, वैज्ञानिकांच्या शोधात असे आढळलेय की कोंबडीचा जन्म आधी झालाय. ओवोक्लोइडिन नावाच्या प्रोटीनमुळे अंड्याचे कवच तयार होते. या प्रोटीनशिवाय अंड्याचे कवच तयार होऊ शकत नाही.