मोबाईलवरून वापरा लँडलाईन... ISD चार्जेसपासून मुक्तता!
`बीएसएनएल`च्या लँडलाईन ग्राहकांसाठी एक कामाची बातमी आहे... कंपनीनं नुकतंच आपलं एक मोबाईल अॅप्लिकेशन बाजारात आणलंय.
मुंबई : 'बीएसएनएल'च्या लँडलाईन ग्राहकांसाठी एक कामाची बातमी आहे... कंपनीनं नुकतंच आपलं एक मोबाईल अॅप्लिकेशन बाजारात आणलंय.
या मोबाईल अॅप्लिकेशनमुळे तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला लँडलाईन वापरून फोन करता येणार आहे.
यामुळे परदेशात जाणाऱ्या ग्राहकांना आयएसडी चार्जेस न भरता कुठेही कॉल करणं शक्य होणार आहे.
'फिक्स्ड मोबाईल टेलिफोनी सर्व्हिस' नावानं २ एप्रिलपासून ही सेवा सुरू होणार आहे. याला महिन्याला चार्जेस भरावे लागतील, मात्र ते किती असतील, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असं बीएसएनएलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितलं.
याखेरीज ग्राहकांना कॉल चार्जेसही द्यावे लागतील. याबरोबरच लँडलाईनवर एसएमएस सेवाही लवकरच सुरू करण्यात येईल, असं श्रीवास्तव यांनी जाहीर केलंय.