BSNL ब्रॉडब्रॅंड प्लान : आता मिळणार अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग सुविधा
BSNLने सुरुवातीला 249 रुपयांत 300 जीबी डेटाची योजना आणली होती. रिलायन्स जिओच्या 4 जीच्या धमाक्यानंतर आणखी एक नवीन योजना आणली आहे.
मुंबई : BSNLने सुरुवातीला 249 रुपयांत 300 जीबी डेटाची योजना आणली होती. रिलायन्स जिओच्या 4 जीच्या धमाक्यानंतर आणखी एक नवीन योजना आणली आहे. जिओकडे ग्राहक आकर्षित होत असताना ही योजना खूपच चांगली आहे.
बीएसएनएलने 1199 रुपयांचा नवा प्लान आणला. यात अनलिमिटेड डेटा आणि और अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. BBG कॉम्बो प्लाननुसार 1199 रुपयांची सुविधा असून यात अनलिमिटेड डेटा आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंग सुविधा मिळणार आहे. 24 तास इंटरनेटची स्पीड 2 एमबीपीएस असेल. तसेच ग्राहक कोणत्याही नेटवर्कला कितीही लोकल आणि एसटीडी कॉल करु शकेल. हा प्लान केवळ लॅंडलाईन यूजर्ससाठी आहे. महिन्याला 1199 रुपये एका महिन्यासाठी चार्ज असेल. यात कोणतेही छुपे किंवा अन्य चार्ज असणार नाही.
एक वर्षासाठी 13189 रुपये आणि दोन वर्षांसाठी 25179 रुपये खर्च करावे लागतील. बीएसएनएलही ऑफर आपल्या ग्राहकांना कायम ठेवण्यासाठी आणली आहे.
पाहा चार्ट :