नवी दिल्ली : सरकारी कंपनी बीएसएनएल (BSNL) आता खासगी मोबाईल कंपन्यांना टक्कर देण्यासाठी कात टाकत आहे. खासगी प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी केवळ १०९९ रुपयांत राष्ट्रीय पातळीवर अमर्यादित ३ जी मोबाइल प्लॅन सादर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, याशिवाय सध्या सुरू असणाऱ्या निवडक प्लॅन्समध्ये दुप्पट डाटा देण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. दूरसंचार क्षेत्रात पहिल्यांदाच बीएसएनएलने अमर्याद ३ जी डाटा प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅनची किंमत १०९९ रुपये असून यामध्ये वेगावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण कंपनीकडून ठेवण्यात येणार नाही. 


BSNL कंपनीच्या ग्राहकांत आणखी वाढ होईल, असे बीएसएनएलचे प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव म्हणालेत. त्याआधी BSNLने देशात पहिल्यांदा २१ ऑगस्टपासून प्रत्येक आठवड्यात ९४ तास मोफत बोलण्याची सुविधा दिली आहे. देशभरात कुठेही मोबाइल आणि लँडलाइनवर फोन करून ग्राहक बोलू शकतात. आतापर्यंत ही सुविधा प्रत्येक दिवशी १० तास अशी मिळत होती. आता शनिवार रात्री ९ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत म्हणजे सलग ९४ तास मोफात कॉल करू शकतात. त्याचप्रमाणे रविवारी चोवीस तास मोफत कॉलिंगची सेवा देखील मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत.