जयपूर : बाजारात रिलायन्स जिओ दाखल झाल्यानंतर मोबाईल आणि इंटरनेट सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपन्यांची झोप उडालीय. आता इतरही कंपन्या मार्केटमधले आपले शेअर्स वाचवण्यासाठी सज्ज झाल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच दरम्यान बीएसएनलनंही आपला नवीन डाटा प्लान ग्राहकांसमोर सादर केलाय. बीएसएनएलनं केवळ ९ रुपये मासिक शुल्कात अनलिमिटेड ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखलीय. 


एक जीबी डेटा वापर होईपर्यंत स्पीड २ एमबीपीएस राहील. यानंतर एक एमबीपीएस स्पीड असेल. 


शुक्रवारपासून ही सुविधा सुरु करण्यात आलीय. बीएसएनएलही कॉल फ्री सुविधा देतेय. यामुळे ब्रॉडबँड युझर्सच्या संख्येतही वाढ झालीय.