नवी दिल्ली : भारतीय दूर संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल लवकरच भारतात परदेशी पर्यटनाला वाढवण्याच्या दृष्टीने नवे पाऊल उचलतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने परराष्ट्र मंत्रालय आणि बीएसएनएल परदेशी पर्यटकांना प्री लोडेड फ्री सिमसह फ्री टॉकटाईम आणि इंटरनेट डेटा उपलब्ध करुन देणार आहे. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने ही सेवा दिला जाणार आहे. 


याप्रकरणी माहिती देताना पर्यटन मंत्री महेश शर्मा म्हणाले, या सेवेंतर्गत फ्री सिमसह ५० रुपयांचा टॉकटाईम आणि ५० एमबी इंटरनेट डेटा फ्री दिला जाणार आहे. यामुळे पर्यटक आपल्या जवळच्या व्यक्तींशी तसेच नातेवाईकांशी संपर्क साधू शकतात. 


ही सेवा सुरुवातीला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरु केली जाणार आहे. त्यानंतर इतर १५ विमानतळांवरही ही सेवा सुरु केली जाईल. या सिमकार्डमघ्ये विविध भाषांसाठीही टोल फ्री हेल्पलाइन असणार आहे.