मुंबई : मुलगा आणि मुलगी यांच्यात केवळ मैत्री असू शकत नाही असे म्हटले जाते. मात्र आता चित्र बदलते आहे. अनेक मुलींचे मित्र हे त्यांचे बेस्ट फ्रेंड असतात. त्यांच्यात मैत्रीपलीकडेच नाते असतेच असे नाही. मुला-मुलींना एकत्र पाहिले की यांच्यात काही तरी सुरु आहे असे म्हटले जाते. मात्र आम्ही केवळ एकमेकांचे चांगले मित्र आहोत असे यावे सांगितले जाते. जाणून घ्या हे किती खरं असतं ते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैत्री विश्वासावर टिकून असते - मैत्रीमध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे विश्वास. विश्वासाच्या पायावर मैत्री घट्ट उभी असते. दोघांचा एकमेकांवर विश्वास असेल तर ते चांगले मित्र राहू शकतात. 


बदल होत आहे - सध्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात मुली भरारी घेत आहेत. अशामध्ये मुलगा-मुलगी एकमेकांचे मित्र होऊ शकत नाही असे विचार कऱणे किती मागासलेपणाचे लक्षण आहे. अजूनही मुलगा-मुलगी एकत्र असले की त्यांच्यात काहीतरी नाते असाच विचार केला जातो. तो बदलायला हवा. 


प्रत्येक आकर्षण हे प्रेम नव्हे - कोणत्याही नात्याची सुरुवात आर्कषणाने होते. एखाद्याच्या सवयी आपल्याला पटतात अथवा आवडतात तेव्हाच त्या व्यक्तीसोबत आपले नाते सुरु होते. मैत्रीच्या नात्यातही असेच असते. मात्र हे आकर्षण प्रेम असतेच असे नाही. 


एक मुलगा-मुलगी मित्र नक्कीच असू शकतात - सध्या जमाना बदलतोय. नात्यांमध्ये मोकळेपणा यायला लागलाय. पूर्वी भावना व्यक्त करणे तितकेसे मोकळेपणाने जमत नसे. मात्र आता तसे होत नाहीये. पूर्वी तर मुलगा-मुलगी एकमेकांशी मोकळेपणाने बोलत नसत. त्यांच्यात एक प्रकारे अवघडलेपण असे. मात्र आता तसे नाही. मुले मुलींशी तसेच मुली मुलांशी मोकळेपणाने बोलतात. त्यामुळे पूर्वीचे ते अवघडलेपण दूर झालेय.