मुंबई : तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही तुमच्या करिअरला एक शानदार वळण देऊ शकता... मग ते कोणत्याही क्षेत्रात असो... असंच एक क्षेत्र म्हणजे 'ज्वेलरी डिझायनिंग'...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्या - चांदीसोबत सध्या इतरही धातूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने वापरले जातात. यामुळेच, ज्वेलरी डिझायनिंगच्या क्षेत्रात करिअर बनवणं सध्याचा उत्तम पर्याय ठरू शकतो. 


इन्स्टि्यूट


जेमोलॉजी इंस्टिट्यूट ऑफ इंडिया, मुंबई सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई जेमस्टोन्स आर्टिसन्स ट्रेनिंग स्कूल, जयपूर इंडियन जेमोलॉजी इंस्टिट्यूट, नवी दिल्ली नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी, नवी दिल्ली ज्वेलरी डिजाईन अॅन्ड टेक्नॉलॉजी इन्स्टि्युट, नोएडा


योग्यता 


या क्षेत्रात अनेक डिप्लोमा, सर्टिफिकेट आणि अॅडव्हान्स डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत. काही इन्स्टिट्युटमध्ये कम्प्युटरच्या साहाय्यानंही ज्वेलरी डिझायनिंगचं प्रशिक्षण दिलं जातं. 


यातील, काही कोर्सेससाठी पदवी धारकांनाच प्रवेश मिळतो तर काही कमी कालावधीचे कोर्सेस तुम्ही बारावीनंतरही करू शकता.