केअरटेकरचा अमानुष अत्याचार सीसीटीव्हीत कैद
स्मृतीभ्रंश आजाराने त्रस्त असलेल्या ९४ वर्षीय वृ्दध महिलेसोबत एका नर्सने केलेल्या अमानवी कृत्याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. माणुसकीलाही लाजवेल असे कृत्य या नर्सने केलेय. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे
नवी दिल्ली : स्मृतीभ्रंश आजाराने त्रस्त असलेल्या ९४ वर्षीय वृ्दध महिलेसोबत एका नर्सने केलेल्या अमानवी कृत्याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. माणुसकीलाही लाजवेल असे कृत्य या नर्सने केलेय. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे
मिरियम मरिनो हिच्या आईला स्मृतीभ्रंशचा आजार झाला होता. आपल्या वृद्ध आईची सेवा करण्यासाठी तिने एक केअरटेकर ठेवली होती. मात्र ही केअरटेकर त्या वृद्ध महिलेची काळजी न घेता चक्क तिला मारहाण करत होती. याबाबतची दृश्ये चक्क सीसीटीव्हीत कैद झालीत.
केअरटेकर वृद्ध महिलेची योग्यप्रकारे काळजी घेत नसल्याचे शेजाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी याची माहिती मिरियमला दिली होती. त्यानंतर मिरियमने आपल्या घरात सीसीटीव्ही बसवले. या सीसीटीव्हीत ही केअरटेकर वृद्ध महिलेला मारहाण करत होती. तसेच पायांनी लाथ मारत होती तसेच तिला उठण्यासाठी मदत करण्याऐवजी तिची मान पकडून तिला उठवत होती. दरम्यान, महिलेच्या कुटुंबियांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय.