मुंबई : प्रत्येक मोबाईलमधून रेडिएशन बाहेर पडत असतात. तुमचा मोबाईल तुम्ही वापरत नसलात तरी तो मोबाईल टॉवरला सिग्नल पाठवत असतो. मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचं प्रमाण जर जास्त असेल तर तो तुमच्यासाठी घातक ठरु शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैज्ञानिकांच्या मते २.० वॅट/किलो रेडिएशन माणसाचं शरिर सहन करु शकतो. त्यामुळे भारत सरकारने सगळ्या मोबाईल कंपन्यांना १.६ वॅट/किलो रेडिएशन सोडणारे मोबाईल फोन तयार करण्याचे आदेश दिले आहे.


खूप अधिक काळ मोबाईलवर बोलत असाल तर हे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. त्यामुळे मोबाईलचा अधिक वापर करणे टाळा. २४ मिनिटांपेक्षा अधिक काळ मोबाईल वापरणं धोकादायक ठरु शकतं. शक्य असेल तेवढा मोबाईल शरिरापासून लांब ठेवा. 


मोबाईलचं रेडिएशन कसं चेक कराल :


तुमच्या मोबाईल फोनवर *#07# डायल करा. तुमच्या मोबाईलचे रेडिएशन लेवल २.६ वॅट किलो असेल तर ठिक आहे त्याहून अधिक असेल तर मोबाईल लगेच बदला.