मुंबई : तरुण-तरुणी अनेकदा एकमेकांच्या प्रेमात पडतात. काहींचं नातं हे अनेक काळ टिकत नाही यासाठी कारणीभूत असतं ते समजूतपणा. नात्यात जर समजूतपणा नसेल तर तुमचं नातं टिकणं कठिन होऊन जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही जर तुमच्या प्रियकरासोबत लग्न करण्याच्या विचारात आहात आणि तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की तुम्ही प्रियकर तुमच्यासाठी परफेक्ट आहे की नाही तर मग खालील गोष्ट तुम्हाला याचं उत्तर देईल.


१. तुम्ही जर तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारतात, फिरायला जातात पण हे जर त्याला आवडत नसेल किंवा तुमच्या मित्रांबाबत तुम्ही त्याला सांगत असाल आणि त्याला त्याचा राग येत असेल तर मग तुमच्यासाठी परफेक्ट नाही. असा व्यक्ती तुमच्यावर अविश्वास दाखवत असेल तर मग त्याला लाईफ पार्टनर बनवण्यात काही अर्थ नाही.


२. जो व्यक्ती नेहमी स्वत:च्या गोष्टींना खूप महत्त्व देत असेल. त्याला तुमच्या भावना, कुटुंब याच्याशी काही देणं घेणं नसेल तर मग तो तुमच्यासाठी परफेक्ट नाही. तुम्हाला महत्त्व देणारा आणि समजून घेणारा पार्टनर असावा. 


३. तुम्ही जर कोणासोबत ही रिलेशनशिप मध्ये असाल आणि तो व्यक्ती जर नेहमी तुम्हाला स्वतः विषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगत असेल तर तो खोटं बोलत तर नाही ना याची खात्री करुन घ्या मगच त्याच्या सोबत लग्नाचा निर्णय घ्या. त्याच्या मागच्या इतिहासाबाबत जाणून घ्याय.


४. जो व्यक्ती तुमच्यावर नेहमी बंधने घालतो, तुम्हाला हे कर आणि हे करु नको असं सांगत असेल तर मग त्याच्या सोबत पुढे रिलेशन ठेवतांना विचार करा. तुम्हाला फोन केला आणि तुम्ही व्यस्त असाल तरी तो व्यक्ती तुम्हाला आताच बोलण्यासाठी जबरदस्ती करत असेल तर हा व्यक्ती तुमच्यासाठी लायक नाही. तो तुम्हाला समजून घेणार नाही.


५. जी व्यक्ती तुमच्या भावनांना काहीही महत्त्व देत नाही. शारीरिक संबंधाची मागणी करत असेल तर मग हा निर्णय घेतांना तुम्ही खूप विचार केला पाहिजे. लग्नासाठी जो व्यक्ती टाळाटाळ करतो पण शारीरिक संबंध ठेवण्यासाठी विचारतो याचा अर्थ त्याला तुमच्यात रस नाही. तो तुमचा वापर फक्त शरीरासाठी करतोय. अशा घातक व्यक्तींपासून लांब रहा.