ICSE बोर्डाचा बारावीचा निकाल ३ वाजता
काऊंसिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) नुसार इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एज्युकेशनच्या (ISC) बारावीच्या परिक्षेचा निकाल आज लागणार आहे.
ICSE बोर्डाची निकालासाठी पहिल्यांदा नवी टेक्नॉलॉजीचा वापर
मुंबई : काऊंसिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) नुसार इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एज्युकेशनच्या (ISC) बारावीच्या परिक्षेचा निकाल आज लागणार आहे. हा निकाल दुपारी ३ वाजता ऑफिशिअल वेबसाईटवर लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही इयत्तांच्या विद्यार्थ्यांनी निकाल cisce.org, cisce.org/results आणि careers.cisce.org या वेबसाईटवर पाहू शकता.
ICSE बोर्डाने पहिल्यांदा लाइव्ह लिंक कॅरेक्टर रेकनायझेशन टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. त्यामुळे निकाल खूपच लवकर जाहीर होईल. यामुळे बोर्डाने ठरवलेल्या तारखेच्या दोन आठवडे अगोदर निकाल जाहीर करत आहे.
निकाल कसा पाहणार...
१) cisce.org, cisce.org/results आणि careers.cisce.org या वेबसाईटवर दुपारी ३ वाजता लॉगिन करा
२) त्यानंतर ISC Class XII results 2016 यावर क्लिक करा
३) रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून निकाल पाहू शकतात.
४) त्यानंतर लगेच तुमचा रिझल्ट स्क्रिनवर येईल. तो तुम्ही Save आणि Donwload करू शकता. आणि त्याची प्रिंट आऊट काढू शकता.
एसएमएसद्वारे रिझल्ट
त्याचप्रमाणे विद्यार्थी SMS द्वारे देखील रिझल्ट पाहू शकता. त्यासाठी ICSE – आपला सिट क्रमांक 09248082883 यावर पाठवू शकतात.