मुंबई : इंजिनिअरींग प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजेच सीईटीचा निकाल नुकताच लागला. यंदा वैद्यकीय सीईटीच्या निकालाचा टक्का घसरला असला तरी इंजिनिअरींगचा निकाल वाढलाय. त्यामुळे यंदा इंजिनिअरींगला प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढलीय. विषेश म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात इंजिनिअरींग कॉलेजमध्ये हजारो जागा रिक्त राहत आहेत. पण यंदा प्रवेशाच्या जागांच्या तुलनेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. 


गेल्या वर्षी इंजिनिअरींगच्या 64 हजार जागा रिक्त होत्या. 2014 मध्ये जवळपास 50 हजार जागा रिक्त होत्या. यंदा इंजिनिअरींगच्या 1 लाख 38 हजार 741 प्रवेशाच्या जागा आहेत. तर त्यासाठी 2 लाख 62 हजार विद्यार्थी पात्र ठरलेत. त्यामुळे यंदा इंजिनिअरींगच्या जागा रिक्त राहणार नसून त्यासाठी मोठी चुरस पहायला मिळणार आहे.