नवी दिल्ली :  कॅनडाची मोबाईल हँडसेट बनविणारी कंपनी डाटाविंड २०० रुपयांध्ये वर्षभर डाटा (इंटरनेट) देणार आहे. यासाठी कंपन आपल्या दूरसंचार कारभारात १०० कोटी रुपये गुंतवणार असल्याचे समजते आहे. लायसन्स मिळाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात १०० कोटी गुंतवणार आहे. 


स्वस्त स्मार्टफोन आणि टॅबलेट बनविणारी कंपनी संपूर्म देशात व्हर्जअल नेटवर्क सेवा देणार आहे. यासाठी लायसन्ससाठी अर्ज केला आहे. हे लायसन्स मिळल्यावर कंपनी डाटा सेवा आणि मोबाईल टेलिफोन सेवा देण्यास सक्षम होणार आहे. हे लायसन्स सध्याच्या दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपनीने भागीदारी केल्यास मिळणार आहे.