मुंबई : मोबाईल हरवल्यास आपण एकदम घाबरुन जातो. काय करावं हे आपल्याला पटकन समजत नाही. पण, मोबाईल हरवल्यावर काही गोष्टी तातडीने करणं गरजेचं आहे. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात आधी कॉल करा
तुमचा जो कोणता फोन हरवला आहे त्यावर आधी एक कॉल करा. कॉल लागत नसल्यास त्यावर एक मॅसेज करा. तुमचा हरवलेला फोन कोण्या भल्या व्यक्तीकडे असेल तर तो तुम्हाला परत मिळण्याची शक्यता असते.


पासवर्ड बदला
तुमचा फोन हरवल्यास जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर डेस्कटॉपवरुन तुमचे पासवर्ड बदला. सोशल मीडिया अकाऊंट, ईमेल आयडी किंवा अगदी ई-बँक सेवेचे पासवर्ड बदला.


अंड्रॉइड डिव्हाइस मॅनेजर
हे फीचर तुमच्या फोनचे लोकेशन शोधून काढण्यात मदत करू शकते. यामुळे तुमचा हरवलेला फोन लॉकही केला जाऊ शकतो.


सिम कार्ड ब्लॉक करा
तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरला कॉल करुन तुमचे सिम कार्ड ब्लॉक करुन टाका. यामुळे तुमच्या सिमकार्डचा कोणी दुरुपयोग करणार नाही.


पोलिसांना माहिती द्या
पोलिसांना तुमचा फोन हरवल्याची माहिती द्या. तुमचा फोन सापडल्यास ते तुम्हाला सांगू शकतील.


अकाऊंटवर नजर ठेवा
तुमच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर नजर ठेवा. चुकून कोणता अकाऊंटचा पासवर्ड बदलायचा राहिला असल्यास कोणी त्याचा दुरुपयोग करू नये.